Wednesday, September 28, 2022

डीएसके प्रकरण.. ईडीच्या न्यायालयात होणार सुनावणी

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

पुणे : गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील खटला आता मुंबईला वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात होणार आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मुंबईतील ईडीच्या सत्र न्यायालयात १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांनी राज्यभरातील सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची २ हजार ४३ कोटींनी फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डीएसके व त्यांची पत्नी हेमंती यांना पुणे पोलिसांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्ली येथून अटक केली होती.

आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ३६ हजार ६७५ पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. डी. एस. कुलकर्णी , पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. येथील न्यायालयात एमपीआयडी कायद्यानुसार सुनावणी सुरू होती. आता मुंबईत एमपीआयडी आणि ईडी दोन्ही प्रकरणांची सुनावणी मुंबईत सुरू राहणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या