Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मद्यधुंद तरुणाची पोलिसाला लाकडी काठीने मारहाण
    गुन्हे वार्ता

    मद्यधुंद तरुणाची पोलिसाला लाकडी काठीने मारहाण

    सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल : पोलिसांची सुरक्षा ऐरणीवर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026No Comments411 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कल्याणमध्ये पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. लाकडी काठीने त्याने पोलिसावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण गौरीपाडा परिसरात नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. खडकपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.

    आरोपी राहुल तायडे या गोंधळ घालणाऱ्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने पोलिस कर्मचारी गणेश यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्याने गणेश यांच्यावर काठीने हल्ला करत त्यांना मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif