Friday, December 9, 2022

मद्यधुंद चालकाचे थरारनाट्य; ७ ते ८ जणांना धडक…

- Advertisement -

 

- Advertisement -

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

नाशिक शहरात आज दि. १७ नोव्हेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने भरधाव वेगाने कार चालवून रस्त्यातील दुचाकी चालक, पादचारी यांच्यासह अनेकांना चिरडले आहे. या गंभीर अपघातामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागांत ७ ते ८ जण जखमी असल्याचे समजते. विशेष म्हणजे जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास एक कारचालक नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरातून येत होता. तो अतिशय बेदरकारपणे वेगाने कार चालवित होता. त्याने महामार्गावर काही वाहनांना धडक दिली. यावेळी कारचे टायरही फुटले तरीही मद्यधुंद अवस्थेत त्याने हा थरार सुरूच ठेवला. चांडक सर्कलला दोन ते तीन राउंड मारून तो एका ठिकाणी धडकला. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी त्याला कारबाहेर काढले. आणि पोलिसांशी संपर्क करून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत संशयित कारचालक पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेत नेमके अजून किती व्यक्ती जखमी झाल्या आहेत ते स्पष्ट झालेले नाही. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दोन व्यक्ती दाखल झाल्या आहेत. यातील एका दुचाकी चालकाच्या दोन्ही पायांवरुन कार गेल्याचे समजते आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या