Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    महाराष्ट्र

    मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!

    कॅब आणि ऑटो चालकांसाठी मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 12, 2026No Comments54 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कॅब किंवा ऑटो चालवताना प्रवाशांशी आता मराठीत बोलला नाही तर , लायसन्स होईल रद्द होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचे व्यवहारिक ज्ञान नसलेल्या चालकांवर परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जाहीर होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करून ‘antecedents’ या शब्दांनंतर “and working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालवण्याच्या अधिकृततेसाठी अर्ज करताना मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

    नव्या नियमानुसार, एखाद्या चालकाला मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास प्रथम त्याला एक महिन्याची मुदत देण्यात येईल. या काळात मराठी शिकण्यात सुधारणा न झाल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

    मंत्री सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, व्यावसायिक वाहन चालकांसाठी मराठीची अट यापूर्वीही नियमांमध्ये होती; मात्र तिची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. प्रवाशांशी सहज आणि प्रभावी संवाद साधता यावा, विशेषतः स्थानिक प्रवाशांना सेवा देताना भाषेचा अडथळा येऊ नये, यासाठी ही अट महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. मंजुरी मिळाल्यानंतर आता या निर्णयाला कायदेशीर स्वरूप मिळणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif