Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    • भुसावळमध्ये 21 किलो गांजा जप्त; सख्ख्या भावांना अटक
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»विसापुर टोल प्लाझावर वाहनचालकाला मारहाण
    महाराष्ट्र

    विसापुर टोल प्लाझावर वाहनचालकाला मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 7, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसीलच्या विसापुर टोल प्लाझा येथे पुन्हा एकदा विवादास्पद घटना घडली आहे. येथे ट्रक चालक राज राममिलन निषाद (वय २२), जाकिर हुसैन वॉर्डचा रहिवासी आहे. याला टोल भरल्यानंतर कर्मचार्‍यांशी झालेल्या वादातून मारहाण केली गेली आहे. ही घटना वाहन क्रमांक एमएच 34 बी झेड 0160 च्या ट्रक चालनाच्या दरम्यान सकाळी साडे दहाच्या सुमारास उघडकीस आली.

    या प्रकरणी पीडित राज निषाद यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, प्राथमिक उपचारासाठी त्यांना बल्लारपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र आवश्यक सुविधा नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार विसापुर टोल प्लाझावर सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ट्रक चालक आणि टोल कर्मचार्‍यांमध्ये काहीतरी वाद झाला. त्यानंतर हा वाद टोकाला पोहोचला आणि ट्रक मालकाला मारहाण झाली ती सहन करावी लागली. यावेळी ट्रक मालकाला टोल देण्यानंतरही काही वाद झाला, ज्यामुळे ही मारपीट झाली.

    स्थानिक वाहनचालकांच्या तक्रारीनुसार, टोल प्लाझ्यावर रात्रीच्या वेळेस “ओवरलोड” चा बोगस आरोप करून जास्त पैसे वसुली केली जाते. ही प्रथा केवळ स्थानिक वाहनेच नाही तर बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या वाहनांनाही लागू होते अशीही तक्रार आहे. या घटनेमुळे स्थानिक लोक आणि वाहनचालकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. ट्रक चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी विरेंद्र परमार यांनी टोल कर्मचार्‍यांच्या “दादागिरी” विरोधात संबंधित प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला असून गरज पडल्यास आंदोलनही करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

    प्रसार माध्यमांचे प्रतिनिधींनी या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, मात्र विसापुर टोल प्लाझाच्या व्यवस्थापक दिलीप कंचर्लावार यांनी ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. या कारणामुळे स्थानिक समाजामध्ये प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनप्रती भीती आणि असमाधान वाढत चालले आहे.

    या प्रकरणी घटनेची चौकशी सुरू असून, पोलीस तपासाद्वारे न्याय मिळवून देण्याचा मागणी होत आहे. पण टोल प्लाझा व्यवस्थापनाच्या या प्रकारामुळे स्थानिक वाहनचालक आणि नागरिकांमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात असंतोष तर वाढत आहेच, त्याचबरोबर टोल व्यवस्थापनात सुधारणा करणे हे देखील अत्यावश्यक ठरत आहे.

    सकाळी ९ ते १०, ४५ पर्यंत, एमएच 34 बीझेड 0160 मोठा ट्रक बल्लारशाहून चंद्रपूर जाणाऱ्या टोल प्लाझ्या मार्गावरील उभा ठेवून ताडपत्री काढून ट्रकातील आतमधली साफसफाई करीत उभा होता. सदरीरल मार्ग दुचाकीस्वाराचा असल्याने अडचण येत असल्याने ट्रक चालकाला “तुमचा ट्रक रस्त्यावरील उभा ठेवु नका लवकर काढा” म्हटले. तर ट्रक चालकांनी ट्रक मालकाला फोन करून बोलवले तर ट्रक मालक सोबत तीघांना घेऊन आले तसेच त्या पहारेकरी ला बोलावून मारणार करून निघून जात असतांना येथील कर्मचारी यांनी त्यांना थांबवून ठेवणाचा प्रयत्न करीत असतांना ते हिसकावून जाणाचा नादात ते दुचाकी ऐक्टिवा मोपेड गाडी घेऊन पडले. झालेली घटना योग्य तर नाही पण मी दिलगिरी व्यक्त करीतो.
    टोल प्लाझा व्यवस्थापक
    दिलीप कंचर्लावार

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026

    सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif