पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) मध्ये वेगवेगळ्या पदांवर रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय पासून डिप्लोमा आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.
या पदांवर करण्यात येणार भरती
ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – ८० पदे
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – ३० पदे
आयटीआय अप्रेंटिस ट्रेनी – ४० पदे
एकूण – १५० पदे
– Indian Army Recruitment: तरुण-तरुणींसाठी भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, आताच करा अर्ज
आवश्यक पात्रता –
वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. आयटीआय व्होकेशनल कोर्स केलेल्या उमेदवारांपासून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे आवश्यक पात्रतेसाठी याची सविस्तर अधिसूचना (नोटिफिकेशन) पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे. बातमीच्या शेवटी लिंक देण्यात आली आहे.
या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ वर्षे ते २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
असा करा अर्ज –
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डीआरडीओ भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. २९ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्ज करण्यासाठीची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.
अशी होणार निवड –
या पदांवर भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. पण पात्रतेसाठीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाणार आहे. अर्ज भरताना दिलेल्या तपशीलांच्या आणि क्वॉलिफिकेशन डॉक्यूमेंट्सच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे.