डॉ. सागर गरुड यांच्यातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या १०५ दिवसांपासुन संप सुरू आहे. या कालावधीत पगार नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे संचालक डॉ. सागरदादा गरुड यांनी किराणा किटचे वाटप केले तसेच शहरातील एस.टी.कर्मचाऱ्यांना तसेच कुटुंबातील सदस्यांना आपल्या हाँस्पिटलमध्ये मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, लवकर सकारात्मक चर्चा होऊन यशस्वी तोडगा निघेल. आपण स्वतः मुंबईमध्ये जाऊन नेत्यांना सांगणार आहे. आपण थोडा धीर धरावा आत्महत्या हा पर्याय नाही तेव्हा निश्चित यातुन मार्ग निघणार आहे. मी ज्या गावात राहतो त्या गावातील माझ्या एस.टी. कर्मचारी बांधवांना छोटीशी मदत केल्याचे समाधान असल्याचे सांगितले.

यावेळी जामनेर, सोयगाव, पाचोरा, कल्याण आगारातील शेंदुर्णी शहरात राहणाऱ्या २० एस.टी. कर्मचारी बांधवांना किराणा किटचे वाटप डॉ. सागर दादा गरुड यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिनेश विसपुते (एस.टी. वाहक सोयगाव आगार), सुभाष गावंडे (एस.टी.कर्मचारी जामनेर आगार) यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. सागरदादा गरुड यांना धन्यवाद दिले व आभार मानले.

शेंदुर्णीच्या विघ्नहर्ता हाँस्पिटलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात हाजी जावाशेठ, योगेश लुणीया, नगरसेवक पती धीरज जैन, फारुख खाटीक, सचिन पाटील, राहुल शिंदे, शरद निकम, रवी निकम, पवन अग्रवाल, भैय्या सुर्वे तसेच मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here