पाल ता. रावेर

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम (भा.प्र.से.) यांनी गुरुवारी दि. ३ रोजी पाल दौऱ्यादरम्यान प्रथम पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालय प्रशासन व स्थानिक नागरिकांनी पाल परिसरासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत ग्रामीण रुग्णालयासाठी लवकरच १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी पाल येथील अनुपमा विश्रामगृहात मुक्काम केला.

शुक्रवारी सकाळी डॉ. गेडाम यांनी पाल येथील सातपुडा जंगल सफारी परिसराला भेट देऊन वृक्षारोपण केले. त्यानंतर वन उद्यान, अनुपमा विश्रामगृह तसेच संपूर्ण सफारी परिसराची पाहणी करून पर्यटन सुविधा, वनव्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनाच्या कामांचा आढावा घेतला. तसेच सातपुडा परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या दोन दिवसीय दौऱ्यात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरीश सहाय, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, रावेरच्या तहसीलदार दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे व श्रीकांत काळे वरिष्ठ पत्रकार दीपक नगरे तसेच वन,महसूल व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


