जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सुरू झालेल्या हे रूग्णालय जिवनवाहीनी ठरत आहे.
अनेक रूग्णांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सूपर स्पेशॅलीटी सेवा उपलब्ध असलेल्या रूग्णालयात उपचार आवश्यक होते आणि ही संख्या जास्त असल्याने प्रशासनासमोर डॉ.उल्हास पाटील रूग्णालय पर्याय दिसून आल्यानंतर माजी खा. डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमी असलेल्या सात वर्षीय मंजू परिहार, धर्माशान सौदे यांना मध्यरात्री रूग्णालयात दाखल केले.
वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश खुरपे, व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी ताबडतोब कुत्रिम श्वासोश्वास व तज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू केले. अबू मोहम्मद, दीपक थापा, उत्तम हरजन, हसन अली, नकिम अंन्सारी, विजयकुमार गौतम, मोहम्मद अली यासह अनेक किरकोळ दुखापत झालेल्या रूग्णांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी दिली आहे. जखमींच्या चौकशीसाठी 9373350009 या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालयाने केले आहे.