radagast's gift chaim potok the gift of asher lev ac moore coupon online corporate usb gifts cash out macy's gift card tribes ascend gift
Thursday, December 1, 2022

प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखावे : डॉ. पदमचंद्र म.सा.

- Advertisement -

 

- Advertisement -

◇ प्रवचन सारांश – 21/08/2022 ◇

- Advertisement -

 

- Advertisement -

जो वेळेचे महत्व जाणतो तो समयज्ञ बनतो व सर्वज्ञ ठरतो. प्रत्येकाने वेळेच महत्त्व जाणावे.  वेळेचे महत्त्व जाणणारा स्वतःचे व दुसऱ्यांचे कल्याण करू शकतो. असे अनुपेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या विशेष प्रवचनात सांगितले.

 

त्यांनी प्रवचनात बुधरजी यांची कथा सांगितली. ते ८४ डाकु सोबत एकटे लढणारे होते. प्राणी पण मानवाला जीवास जीव लावतात. त्यांची सांडणी त्यांच्या सोबत होती. डाकूने बुधर यांच्या दिशेने खंजर शस्त्र मारून फेकले ज्यामुळे मान कापली जाऊन ते मृत्यूमुखी पडले असते. हे बुधरजींच्या सांडणीने ते पाहिले. आपल्या मालकाच्या मानेवरचा तो वार सांडणीने आपल्या स्वतःच्या  मानेवर झेलला. स्वतःच्या प्राणाची  आहुती देऊन सांडणी मालकाचे प्राण वाचवून मृत्युमुखी पडते. इतका शूर वीर, खंबीर मन असलेले बुधरजी सांडणीसाठी अक्षरश: रडतात. सांडणीच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी म्हणून ते धनाजी महाराज यांच्याकडे पोहोचले. महाराजांनी  सांगितले की, सांडणी पेक्षा तुझ्या आत्म्याला शांती मिळायला हवी. सांडणीच्या मृत्यु मुळे बुधरजींना डिप्रेशन आले. पूज्य दादाजी महाराजांनी त्यांना समजावले. ६३ व्या वर्षी बुधरजी यांनी संयम मार्ग स्वीकारला. जो वेळेला जागृत होतो, वेळेला ओळखतो तो खरा असतो. बुधरजी यांनी वयाच्या 63 व्या वर्षी दीक्षा घेतली. तेव्हापासून त्यांनी खूप तपश्चर्या केली. तपश्चर्येनं ओज,  तेज वाढले. त्यांचे 9 शिष्य झाले. त्यांची पुण्यवाणी, संयम किती मोठी होती. बुधरजी महाराजांचे जीवन खूप स्वच्छ, सरळ आहे. ते समयज्ञ झाले, त्यांनी वेळेचे महत्त्व जाणले होते म्हणून ते महान बनले.

 

डॉ. पदमचंद्र म. सा. १० व्या इयत्ते पर्यंत व्यासपीठावर बोलले नव्हते. आपल्या आयुष्यातील पहिले भाषण  महात्मा गांधी यांच्या जयंती 2 ऑक्टोबरला झाले. त्यावेळी त्यांना  मिळालेले प्रोत्साहन उपयोगी ठरले. त्यानंतर सभाधीटपणा आला. तेव्हा  वेळेचे महत्त्व ओळखले ते ज्ञानी झाले. लहान मुलांना धर्मसभा, प्रवचन वेळी बोलू द्यावे. त्यातून एखादा हिरा, वक्ता तयार होईल. पूर्वी विद्यार्थी ६४ कला शिकत असत. गुरुकुलमध्ये सर्व काही शिकविले जात असे. गुरुकुल शिक्षणपद्धती बंद झाली. पूर्वी वैदीक गणित होते. त्याच्या मुळे एका क्षणात आकडे मोड करता येते. पूर्वी सारखे गुरुकुल, भारतीय संस्कृती पद्धतीने मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा असे सांगितले.

मुलांना उत्तम संस्कार द्यावे. प्रेमाने व शांतीने भावाभावांनी रहावे. ते संपत्तीसाठी लढणारे नसावेत, नोकरांच्या विश्वासावर त्यांनी राहू नये. असा संदेश त्यांनी सहज दिला.

दोन भावांची एक गोष्ट त्यांनी प्रवचनात सांगितली. धनदत्त व धनपाल आणि राजकुमार एकाच गुरुकुलमध्ये शिकतात. राजकुमाराला गणित शिकविले. त्याबदल्यात काही वेळेसाठी राज कारभार करण्याची संधी दिली जाईल असे राजपुत्र कडून लिहून  घेतले.  एका भावाला एक प्रहरसाठी राज्य करायला मिळाले. तो काहीच करू शकला नाही. दुसरा भाऊ मात्र वेळेचे महत्त्व जाणतो. एकेका क्षणाचा उपयोग करतो. तो भावाचे  सर्व ऋण चुकते करतो. वेळेचा पुरेपूर सदुपयोग करतो. प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग करावा असे आवाहन करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या