खळबळजनक ! खरेदीत अपहार.. तत्कालीन सिव्हील सर्जनसह चौघे निलंबीत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. कोरोना संकटाच्या काळात विविध वस्तूंच्या खरेदीत अपहार केल्याने तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्यासह चौघांना निलंबीत करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर काय कारवाई केली जाते. याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

कोरोना संकटाच्या काळात लागणाऱ्या विविध अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीत घोळ झाल्याचे आरोप आधीच करण्यात आले होते. जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी आंदोलन देखील केले होते. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीत जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे व लेखा अधीक्षक हरिपाठ वाणी यांना नियमबाह्य व अवास्तव खरेदीला मंजुरी दिल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले होते. यानंतर याच प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूलाल बारेला तर प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी व प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय डॉ. संदीप पाटील या चौघांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.