विषबाधेच्या रुग्णांची डॉ. केतकी पाटलांनी केली विचारपूस

पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

सोमवार रोजी चोपडा तालुक्यातील कमळगाव, चांदसरी, अडावद, पांढरी, मितावली, पिंपरी या गावात पाणीपुरीतून विषबाधा होऊन शेकडो रुग्णांना प्रकृती खराब झाली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी चोपड्यासह अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपुस केली. यात दोन वर्षाच्या बालकापासून ते वयोवृद्ध महिलेलाही विषबाधा झाली आहे, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल, यापुढे पावसाळ्यात तब्बेतीची काळजी घ्या असा सल्ला डॉ. केतकी पाटील यांनी दिला.

या भेटीवेळी डॉ. केतकी पाटील यांच्या समवेत भाजपाचे माजी शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष कमलेश पाटील, ता. सरचिटणीस दीपक भोसले, पंचायत राजचे पदाधिकारी तुषार पाठक, यु. मो. शहर सरचिटणीस विशाल भावसार, शहर कोषाध्यक्ष धीरज सुराणा, गोपाल पाटील, संदीप चव्हाण, जितेंद्र महाजन, भाजपाच्या शहर उपाध्यक्ष अनिता नेवे, शहर सरचिटणीस अरुणा पाटील हे उपस्थित होते.

या प्रादुर्भावासंदर्भात जळगाव येथील आर एम ओ डॉ. सुपे, डॉ, बाभळे, डॉ. नीलिमा देशमुख, इन्चार्ज डॉ. सागर पाटील, तृप्ती पाटील, सिस्टर शिंदे, सिस्टर श्रीमती एम एस धमके आदी उपस्थित होते. संपूर्ण स्टाफ रुग्णांच्या सेवेत असून त्यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप परतावे याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी डॉ केतकी पाटील यांनी चर्चा केली.

दरम्यान अडावद ता. चोपडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विषबाधेमुळे उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची डॉ केतकी पाटील यांनी भेट घेतली. येथे सात ते आठ रुग्ण उपचार घेत आहेत. अडावद तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, डॉ. नितीन अहिरे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. सोनाली सरोदे, डॉ. पंकज पाटील, डॉ. प्रशांत पाटील आणि पूर्ण स्टाफ यांचे प्रयत्न चालू आहेत.

मी एक डॉक्टर या नात्याने नागरिकांना नम्र विनंती करते की, पावसाळ्याच्या काळात कुठलेही बाहेरचे आणि उघड्यावरील पदार्थ खाऊ नये किंवा खात असल्यास काळजी घ्यावी.
डॉ. केतकी पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.