डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

0

डॉ. जान्हवी बनकर सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित

जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा व रूग्णालयातील कान नाक घसा विभागाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. जान्हवी बनकर यांना सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. मोरवाणी ईएनटी आणि लॅटरल स्कल बेस ग्रुप यांच्या वतीने,एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे, नवी मुंबई येथे १३ ते १५ जून २०२५ दरम्यान सूक्ष्म कान शस्त्रक्रियेसाठी टेम्पोरल बोन डिसेक्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या शैक्षणिक कार्यशाळेत डॉ. जान्हवी बनकर यांनी प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला.कार्यशाळेचे आयोजन ईएनटी आणि अ‍ॅनाटॉमी विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते.या उत्कृष्ट उपक्रमासाठी डॉ. जान्हवी बनकर यांना सर्वोत्कृष्ट विश्लेषक पुरस्काराने सन्मानित त्यांना विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. श्रुती पाटील आणि डॉ. पंकजा बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.जान्हवी बनकर यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकीताई, डॉ वैभव, डॉ अनिकेत,डॉ. अक्षता पाटील यांच्यासह वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.