जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
माहिती व जनसंपर्क खात्याचे नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सोमवारी दैनिक लोकशाहीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी दै. लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर यांनी तसेच सल्लागार संपादक धों. ज. गुरव यांनी त्यांचे स्वागत केले. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दै. लोकशाही २०२५ ची दिनदर्शिका तसेच लोकशाहीचा दिवाळी अंक त्यांना भेट देण्यात आला. दै. लोकशाहीच्या सर्व विभागांची डॉ. गणेश मुळे यांनी आस्तेवाईकपणे माहिती घेतली. दै. लोकशाहीने मुद्रित माध्यमाबरोबरच डिजिटल माध्यमातून जी प्रगती केली त्याचे डॉ. मुळे यांनी कौतुक केले. यावेळी दै. लोकशाहीचे सहकारी दीपक नगरे, अनिकेत पाटील, विवेक कुलकर्णी, प्रसाद जोशी, सुरेश सानप, संजय निकुंभ ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते.