विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव मेहतर समाजातर्फे उत्साहात साजरा
जळगाव (प्रतिनिधी) –श्री महाऋषी नवलधाम, वीर रजसिंगजी की मेढी येथे मेहतर समाजातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली, तर दीपप्रज्वलन माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजुमामा भोळे , काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, आत्मचरणजी इंडोरे, आर.पी.आय.चे अनिल अडकमोल, सरकारी वकील राजेशजी गवई, दितीय सपकाळे, सुरेश सोनवणे, मुकेश कुरील, खालिद एलेकर, बंसी डाबोरे, नरेश इंडोरे, विलास मेघे, सुनीत सपकाळे, सुभाष डेडवात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सामाजिक समतेच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप ढंढोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवलधाम गोगामेडी संस्थेचे अध्यक्ष आशितोष ढंडोरे, बंटी डाबॉरे, रोहित बेडवाल, हर्षल ढंढोरे , मनोज जयराज, बंटी खरात, शंकर डाबोरे, भोपू अठवाल, कैलास अहिरे, मनोज कंडारे , विनोद अठवाल, संतोष ढंडोरे, पवन डाबोरे, अमित धवलपुरे, उज्वल बेडवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला दलित समाजासह इतर समाजांतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष आशितोष ढंडोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.