पैस्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पांढरद ता. भडगाव येथे सासरच्या मंडळींकडून शेती घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू होता‌. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील माहेर असलेल्या शितल हिचा विवाह पांढरद ता. भडगाव येथील अजय अशोक पाटील यांचेशी १३ वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीचे ६ वर्ष चांगली वागणूक मिळाल्यानंतर पती अजय पाटील यांना दारुचे व्यसन लागले. यातच पती, पत्नीत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. सदरचा प्रकार शितल हिने माहेरी सांगितला असता पती अजय पाटील यांना त्याचा राग येवुन तु माझी सर्वत्र बदनामी करत असुन याप्रकरणी सासरच्या व माहेरच्या मंडळींकडून मध्यस्थी करत शितल हिस नांदायला पाठविले. दरम्यान शितल हिच्या कडे शेती घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणावे अशी मागणी सासरच्या मंडळींकडून होवु लागली. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शितल हिने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अजय अशोक पाटील (पती), अशोक राजाराम पाटील (सासरे), ज्ञानेश्वर राजाराम पाटील (जेठ), रुपाली ज्ञानेश्वर पाटील (जेठानी), अनिल मधुकर पाटील, सतिष मधुकर पाटील सर्व रा. पांढरद ता. भडगाव यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.