नोकरीवाली नको रे बाबा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड्स ब्लॅव्हॅत्निक स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (University of Oxford’s Blavatnik School of Government) येथे पीएचडी करणाऱ्या दिवा धर यांनी त्यांच्या अभ्यासामधून ही गोष्ट समोर आणली आहे.कि, भारतातील मुलांना शिकलेल्या मुली बायको म्हणून नको आहेत, असं एका अभ्यासातून पुढे आलं आहे. ही धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. काळ बदलला तरी समाजाची मानसिकताही बदलणं गरजेचं आहे.

मॅट्रिमोनियल वेबसाईट्स (Matrimonial Websites) म्हणजेच विवाह जुळविणाऱ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्यावर नोकरी करणाऱ्या मुलींना कमी पसंती दिली जात असल्याचं समोर आलं आहे. भारतातील लग्नाच्या बाजारात वर्किंग वुमेन म्हणजे काम करणाऱ्या मुलींना शिक्षा भोगावी लागते, म्हणजेच त्यांना जीवनसाथी म्हणून पसंती देण्याचं प्रमाण कमी आहे, या गृहितकावर आधारित हा अभ्यास होता.

ज्या मुलींनी कधीही काम केलेलं नाही त्यांना, ज्या मुली नोकरी करत आहेत आणि ज्यांना पुढेही नोकरी करत राहायचं आहे त्यांच्यापेक्षा 15 ते 22 % जास्त पसंती दिली जात आहे (Working Women getting Less Response). 100 पुरुषांनी कधीही नोकरी न करणाऱ्या स्त्रियांना पसंती दिली तर फक्त 78 ते 85 % पुरुषांनी नोकरी करणाऱ्या मुलींना पसंती दिली आहे.

भारतातील स्त्रियांच्या कामाचा सहभाग यावर धर संशोधन करत आहेत. हा प्रयोग करण्यासाठी त्यांनी आघाडीच्या मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर 20 काल्पनिक प्रोफाईल्स (fabricated profiles) तयार केली. वय, जीवनशैली , खाणं-पिणं किंवा अन्य सर्व गोष्टी या सर्व प्रोफाईल्समध्ये जवळपास सारखीच होती. फक्त नोकरी, भविष्यात नोकरी करायची आहे का आणि उत्पन्न या गोष्टी प्रोफाईल्समध्ये वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध जातीच्या ग्रुप्ससाठी तिनं वेगवेगळी प्रोफाईल्स तयार केली होती. “याला काही प्रमाणात प्रोफाईल जुळणाऱ्या काहीजणांची मी निवड केली. मी तयार केलेल्या प्रोफाईल्समधून त्यांना इन्व्हाईट्स पाठविली गेली,”असंही त्यांनी सांगितलं.

“ज्या मुली नोकरी करत नाहीत त्यांना पुरुषांकडून जास्त प्रतिसाद मिळाल्याचं त्यांना दिसून आलं. यानंतर ज्या मुली सध्या नोकरी करत आहेत पण लग्नानंतर त्यांची नोकरी सोडायची तयारी आहे अश्या मुलींनाही प्राधान्य होतं, अनेक तरुणींना लग्नाच्या बाजारात ज्या गोष्टीबद्दल संशय आहे, ती गोष्ट वास्तव असल्याचं यातून समोर आलं. ” म्हणजेच नोकरी करणारी मुलगी असेल तर तिला फारशी पसंती दिली जात नाही असं जे मुलींना वाटतं ते काही प्रमाणात तरी खरं आहे. पण यातही विरोधाभासाची एक गोष्ट समोर आली आहे. जास्त कमावणाऱ्या स्त्रिया, ज्यांना लग्नानंतरही काम करणं सुरुच ठेवायचं आहे, त्यांच्यायोग्य मुलांकडून जास्त पसंती दिली जात आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत ज्या स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कमावतात त्यांना 10 टक्के कमी प्रतिसाद दिला तर ज्या त्यांच्यापेक्षा कमी कमवणाऱ्या स्त्रियांना 15 टक्के कमी प्रतिसाद देण्यात आला. जर तुम्ही कमावणारी बायको असाल तर ती गोष्ट तुमच्या संसारात अधिक गोडी आणणारी असते, असं त्यांचं म्हणणं आहे; पण प्रत्यक्षात असं होत नाही.

लग्नाच्या बाजारात ही परिस्थिती असल्याने भारतातील स्त्रियांचा कामातील सहभाग (Labour Participation Of Women) हा कमी आहे. याचं मुख्य कारण भारतातील विवाहसंस्थेबाबतचे नियम, समजुती हे आहे, असं धर यांचं म्हणणं आहे. “भारतात वयाच्या 40 वर्षांपर्यंत बहुतेक स्त्रियांचं लग्न झालेलं असतं. मात्र तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. यामुळेच एकतर लग्नाआधी मुली करिअर करावं की नाही अशा गोंधळात असतात किंवा लग्नानंतर त्या नोकरी करणं थांबवतात किंवा त्यांच्या चांगल्या चाललेल्या करिअरचा बळी देतात. या संशोधनानंतर आता धर या त्याचा आणखी पाठपुरावा करत आहेत. हा पूर्वग्रहित दृष्टिकोन कमी करण्यासाठी विविध संशोधन करणं हे त्यांचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांचं करिअरही तितकंच महत्त्वाचं आहे हे समजण्याची आपल्याकडे अत्यंत गरज आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.