लोकशाही संपादकीय लेख

नुकतीच अस्तित्वात आलेली कॉक्रोच जनता पार्टीचे आठ दिवसात त्यांचे कोट्यावधी फॉलोवर झाले. सहा जूनला नवी दिल्ली येथे जंतर मंतर रोडवर तरुणांचे यशस्वी आंदोलन झाले. या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना अमेरिकेतून नवी दिल्ली येऊ देतात की नाही? त्यांना विमानतळावर अटक होते की काय? अशी शंका होती. पण ते काही झाले नाही. ते नवी दिल्लीला हातात आंबेडकरांचे पुस्तक घेऊन आले. त्यांनी तेथून तडक नवी दिल्लीच्या जंतर-मंतर रोडवर जमा झालेल्या लाखो तरुणांमध्ये सामील होऊन दुपारी बारा ते पाच पर्यंत आंदोलन केले. अहिंसक पद्धतीने हे आंदोलन झाले. “शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या..” अशा घोषणा देत सर्व तरुण वर्गात जोश भरला होता. अभिजीत दीपके यांची भाषणे झाली. सायंकाळी पाच नंतर आंदोलन संपले. परंतु शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा काही आला नाही. दिल्लीचे आंदोलन संपेपर्यंत 11 जूनला पुणे येथे कॉक्रोच जनता पार्टीचे दुसरे आंदोलन होईल अशी घोषणा करण्यात आली आणि पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात आंदोलकांना आंदोलन करण्याची परवानगी मिळाली. नवी दिल्ली पेक्षा जास्त जोमाने आणि उत्साहाने हे पुण्याचे आंदोलन काल 11 वाजून नाही 11 जून रोजी पार पडले. दिल्लीपेक्षा जास्त तरुणांची गर्दी पुणे येथे झाली होती. इतकेच नव्हे तर काही पालक समाज सुधारक काही वरिष्ठ नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.. च्या घोषणा पुणे येथील विद्यापीठ परिसरात दणाणून गेल्या. येथे सुद्धा काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनात हजेरी लावली. पुणे येथील तरुणांचा उत्साह पाहून अभिजीत दिपके यांचा उत्साह द्विगुणीत झाला. पुणे येथे अभिजीत दिपके यांनी दोन-चार ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे येथील आंदोलन सिस्टिमॅटिक रित्या झालेले पाहून त्याला समाधान वाटले. त्याच बरोबर आंदोलनात तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिक सामील झाले, हे पाहून त्याला आनंद झाला. पुणे विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या आंदोलनानंतरही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला नाही. त्यासाठी अभिजीत दिपके यांनी येत्या 20 जून पर्यंत भारताच्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे आणि आज ठरल्याप्रमाणे लखनऊ येथे इको गार्डन परिसरात तरुणांनी म्हणजेच कॉक्रो जनता पार्टीने आपले आंदोलन केले. लखनऊ येथे देखील आंदोलनात शिस्तबद्ध रित्या पार पडले. घोषणा एकच होती “शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या… राजीनामा द्या..” यानंतर बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथे देखील आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. त्यानंतर 20 जून रोजी नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येईल. अर्थात हे आंदोलन जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत करण्यात येईल असे दीपके यांनी म्हटले आहे. म्हणजे 20 जूनला बेमुदत आंदोलन नवी दिल्ली येथे करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे..
सोशल मीडियावर आठ दिवसांपूर्वी जन्मलेल्या काँग्रेस जनता पार्टीने बघता बघता फार मोठी भरारी मारली आहे. सोशल मीडियावरील त्यांचे फॉलोवर्स संख्या पाहून सोशल मीडिया बंद करण्यात आले आहे. परंतु अभिजीत दिपके यांची कायदे शीररित्या काय करता येईल हे पाहत आहेत. दरम्यान दुसरे अकाउंट ओपन करण्यात आले. त्याला एक तासात बत्तीस हजार फॉलोवर्स मिळाले. त्यामुळे एक अकाउंट बंद केले तरी दुसरे अकाउंट ओपन करण्यात आले. परंतु हे अकाउंट बंद करण्याचा सत्ताधारी पक्षाचा निर्णय काही योग्य नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, तशातला हा प्रकार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिपके यांनी दिली आहे. तुम्ही नवीन पक्ष स्थापन करताय काय? असा प्रश्न विचारल्यावर अभिजीत दिपके म्हणतात कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म होऊन आता अनेक दिवस झाले आहेत. सध्या पार्टी युवकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना घेऊन आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुढच्या परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. आज नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार आपण करणार आहेत की नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर बेरोजगारीला धरून आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला सत्ताधाऱ्यांनी हलक्या घेऊन चालणार नाही. करोडो युवकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे त्याचा विचार झाला पाहिजे.

