Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»दुपारी 12 ते 4 अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका!
    हवामान

    दुपारी 12 ते 4 अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका!

    एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाने जुन्या नोंदी मोडल्या
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026No Comments491 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

    अकोल्यात 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी अकोला, अमरावती, चंद्रपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. राज्य दुहेरी संकटात आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला.

    गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची लाट असून याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो अकोलाकरांना बसत आहे. काल अकोलाचा तापमान 45 इतकं होत. सततच्या वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले.आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे, भरपूर पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    यासोबतच आजपासून अनेक ठिकाणी शाळा आणि क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगावात उष्णतेची तीव्रता वाढली असून 43.4°C तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील यंदाचे सर्वाधिक तापमान जुन्या नोंदी मोडल्या. कडक उन्हामुळे नागरिक हैराण दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र. वाढत्या तापमानामुळे रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. दुपारी 12 ते 4 दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या नागरिकांना प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे झेंडू फुलांच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून उष्णतेच्या तडाख्यामुळे फुलांची वाढ खुंटणे, कळ्या गळणे आणि फुलांची गुणवत्ता घसरणे असे परिणाम दिसून आले आहेत. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून बाजारातील आवकही कमी झाली आहे. त्यातच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने झेंडू फुलांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif