महागाईचा झटका ; घरगुती गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवे दर

0

मुंबई : महागाईने सर्वसामान्य माणसाचे हाल होत असताना आज सकाळी आणखी एक झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांचे बजेट आता पूर्णतः कोलमडणार आहे.
दिल्ली आणि मुंबईमध्ये आजपासून 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सिलेंडरची किंमत 1 हजार 3 रुपयांवरुन 1052 वर गेली आहे. सध्याच्या दरानुसार दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये झाली आहे. तर, मुंबईत 1052.50 रुपये मोजवे लागणार आहे. कोलकात्यात 1079 ₹ आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये सिलेंडरचा दर झाला आहे.
याआधी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मागील महिन्यात वाढ करण्यात आली होती. तर, मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.