कुत्रा भुंकला म्हणून चक्क शेजारच्या माणसाने केले भयानक कृत्य, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेकांच्या घरात कुत्रा पाळला जातो. पण काहींना मात्र ते आवडत नाही. कुत्र्याच्या भुंकण्याचाही त्रास काहींना होतो. भेवनेश्वर मध्ये एका इसमाला शेराच्या घरातील कुत्र्याच्या भुंकण्याचा प्रचंड त्रास झाला. मात्र ही बाब शांतपणे सोडवण्याऐवजी त्याने वेगळाच मार्ग निवडला. त्यामुळे सगळेच चकित झाले. त्याने कुत्र्याला इजा पोहोचवली. एवढेच नाही तर त्याच्या मालकिणीसोबतसुद्धा गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, त्या महिलेने इसम आणि त्याच्या वडिलांवर गंभीर आरोप लावले आहे. महिलेने सांगितले की, आरोपीने तिचे केस पकडून तिला रस्त्यावर ओढले आणि नंतर तिचे कपडे देखील फाडले. आरोपीने तिच्या पाळीव कुत्र्याच्या प्रायव्हेट पार्टमधे रॉड घुसवल्याचा आरोपसुद्धा केला आहे.

नेमकं काय घडले?
संपूर्ण प्रकरण हे ओडिशातील भुवनेश्वरमधील कॅपिटल पोलिस स्टेशनचे आहे. रिपोर्टनुसार, चंदन नायक असे आरोपीचे नाव आहे. त्याने पाळीव कुत्र्यावर धारदार शस्त्रानेवर केला. या संपूर्ण घटनेसंदर्भात महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली असून, आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास आरोपी चंदन आणि त्यांचे वडील तिच्या घरासमोर आले आणि आरडाओरड करू लागले. महिलेने दरवाजा उघडताच दोघांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिच्या कुत्रा भुंकत असल्याचे त्रास होत आहे. त्याला शांत कर असे आरोपीने तिला सांगितले. मात्र त्याच्या उद्धट, अरेरावी गाजवणाऱ्या टोनमुळे महिलेने कुत्र्याला शांत करण्यास नकार दिला. तेव्हा चंदनने तिचे केस पकडून घराबाहेर ओढत आणलं. आणि तिचे कपडेही फाडले. यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला आणि अत्याचारही करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या संपूर्ण घटनेत आरोपीच्या वडिलांनी त्याला पुरेपूर साथ दिली.

एवढाच नव्हे तर आरोपीने तिच्या कुत्र्यावर टोकदार रॉडने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमधे तो रॉड घुसवल्याचा आरोपीही महिलेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणी महिलेने गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपस सुरु केला आहे. आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.