Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ड्रग्स थांबवण्याची सरकारमध्ये ताकद नाही का?
    राजकारण

    ड्रग्स थांबवण्याची सरकारमध्ये ताकद नाही का?

    कुणी केला सरकारला जळजळीत संतप्त सवाल?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments159 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईतील ड्रग्स प्रकरणासह नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर, लैंगिक छळावरून अमित ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अमित ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर आपण जर सत्तेत असतो तर अशा लोकांना अगोदर फासावर चढवले असते असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी मोकळी दिल्यास सर्व गुन्हेगार नीट होतील असे भाष्य केले. आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    राज ठाकरेंनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. आम्ही सगळ्यांना वन टू वन भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना देणार आहोत.25 आणि 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागात जाणार आहोत. इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहोत, असे अमित ठाकरे म्हणाले.

    हे सगळं दुर्देवी आहे. राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून, असा सवाल त्यांनी विचारला. सगळ्या शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्याची ताकद सरकार मध्ये नाहीये का , असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. पोलिसांना फ्री HAND द्या. आपल्या शहरांना कुठे आणून ठेवलं आहे. ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतात हे भीषण आहे. याचे आकडे सरकारकडे नाहीयेत का. अशी अनेक आरोपी आहेत जे ड्रग्स विकतात. शाळेच्या बाजूला ड्रग्स विकले जात आहेत. कठोर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात घाणेरडी शिक्षा द्या. राज्यात ड्रग्स येतात त्यावर सरकारने काम करावे, असे अमित ठाकरे म्हणाले.

    आम्ही रस्त्यावर उतरून काय करू. प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे. आम्ही तर रस्त्यावर उतरूच. कारवाई झाली पाहिजे. आपण PORCHE कार प्रकरण विसरलो. सरकारला विचारलं पाहिजे की ड्रग्स येतात कुठून? एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात कुठून? हे प्रश्न विचारले पाहिजे. 100 टक्के सगळ्या कंपनींचे ऑडिट झाले पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या कंपन्यांत कोण काम करता. ऑडिट झालं पाहिजेच, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

    मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती. एक उदाहरण सेट करा. तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावा. महाराष्ट्र राज ठाकरेंच्या हातात द्या महाराष्ट्र राज ठाकरेच साफ करू शकतात. आणि त्यांनी सांगावं की आरोपींना माझ्यासमोर उभे करा. आता पोलिसांना फ्री हँड आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif