Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ कराच!
    लोकशाही विशेष

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ कराच!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 19, 2026No Comments285 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही आरोग्य विषयक लेख

    हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. कामामुळे कित्येकांना तासनतास लॅपटॉप, डेस्कटॉपसमोर बसावं लागतं. कामाचे तास संपल्यानंतर मोबाईल, टीव्ही अशा स्क्रिन समोर असतातच. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. अनेकांचे ऑनलाईन क्लास मोबाईल किंवा लॅपटॉपवर होतात. शिवाय मुलं टीव्हीसुद्धा खूप पाहतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो आहे आणि कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे. एवढंच नाही तर मुलांमध्ये चष्म्याचा नंबरही खूप पटापट वाढत जातो. हे सगळं टाळायचं असेल तर मुलांकडून काही व्यायाम नियमितपणे करून घ्या. यामुळे त्यांचा चष्म्याचा नंबर वाढणार नाही. तसेच नजर सुधारण्यासही मदत होईल.

    चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी व्यायाम

    जेव्हा तुम्ही हे डोळ्यांचे व्यायाम कराल तेव्हा सगळ्यात पहिला नियम हा की स्वच्छ हवेत, मोकळ्या जागी आणि सुर्यप्रकाश येईल त्याठिकाणी बसून हे व्यायाम करा.

    1. पहिला व्यायाम म्हणजे डोळे घट्ट मिटा आणि त्यानंतर पुन्हा उघडा. अशी डोळ्यांची उघडझाप साधारण १० वेळा करा आणि असे ५ राऊंड करावे.
    2. डोळ्यांची उघडझाप करण्याचा व्यायाम झाल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते डोळ्यांवर ठेवा. हातांमध्ये निर्माण होणारी उब डोळ्यांसाठी अतिशय चांगली असते. असे ३ ते ४ वेळा करा.
    3. यानंतर अगदी सावकाशपणे मान न हलवता डोळे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने गोलाकार फिरवा. असं साधारण दोन्ही बाजुंनी ५- ५ वेळा करा.
    4. यानंतर उजवा किंवा डावा हात समोर करा. हात खांद्याच्या रेषेत सरळ असू द्या. त्यानंतर हाताच्या अंगठ्याकडे नजर केंद्रित करा. अंगठा डावीकडे, उजवीकडे असा प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवा आणि ते करत असताना अंगठ्याकडेच नजर केंद्रित करा.
    5. यानंतर अंगठा वर आणि खाली असा प्रत्येकी ५- ५ वेळा करा. हे करतानाही अंगठ्याकडे नजर स्थिर ठेवा.

    डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी काय खायचे

    • गाजर (गाजर) व्हिटॅमिन ए वाढवतो – रेटिना मजबूत
    • पालक / मेथी / शेपू      डोळ्यांना ओमेगा + ल्युटीन मिळते
    • बदाम + अक्रोड (3-4 रोज) : मेंदू आणि डोळे दोन्ही मजबूत
    • गव्हांकुर / तूप : डोळ्यांच्या कोरडेपणात आराम
    • अळशी : दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत
    • रोज सकाळी 1 ग्लास गाजर + बीट + टोमॅटोचा रस (बिनसाखर) खूप फायदेशीर.

    घरगुती उपाय

    • दुधात कापसाचा बोळा भिजवून डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवा
    • डोळ्यांची जळजळ व थकवा कमी होतो.
    • तूप (घरचे) 1 चमचा रात्री जेवणानंतर
    • डोळ्यांचे स्नायू पोषक राहतात.

    #mobile eye health Eyes glasses laptop screen time Tv
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif