रेती चोरी, अवैध व्यवसाय करू नका अन्यथा पोलीस ठोकणार बेड्या
पोलीस अधीक्षक यांचे जाहीर आवाहन : ११२ डायल करा
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन वाहतुक सुरू आहेत तसेच अवैध व्यवसाय या प्रकारावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथक चंद्रपूर यांचा वेगवेगळ्या पथकांनी गेल्या हप्त्यातभरात कारवाई चा बडगा उगारुन कारवाई चा सपाटा सुर केल्याने रेती चोरट्यांची तारांबळ उडाल्याची दिसून येत आहेत.
तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात, गुन्हेगारी प्रवुत्ती ईसमाविरुध्द तसेच गांजा व्यवसायीक, सेवन करणारे, चौका – चौकात सट्टा बजार भरून “हम किसी को डरते नही” असे म्हणारे सफेद कपड्यातील गावगुंड, कोंबड बाजार भरवून गरीबांचा खिशाला कात्री मारणारे खिशे कापु ईसमाविरुध्द धडक कारवाई ची मोहीम पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचा निदर्शना नुसार चालु आहे.
सदर वेगवेगळया भागातील म्हणजे राजुरा, भद्रावती, विरूर, पडोली, रेती चोरट्या मार्गानेच वाहतुक करीत असतांना त्या आरोपींचा मुसक्या बांधून ताब्यात घेत चोरी केलेल्या हद्दीतील पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करून चोरीचे वाहन रेतीसह ७४ लाख ४ हजार रुपयांपर्यंत मुद्देमाल जप्त केला तसेच ११ चोरटय़ांविरुद्ध सबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील सर्व पथकातील पोलीस व अधिकार यांना मोठे यश आल्याची सूत्रानुसार माहीती प्राप्त झाली.
सट्टा- पट्टी, जुगार मादक पदार्थ विक्री, सेवन करणाऱ्याविरूध्द कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचा कारवाई चा सपाटा सुर असतांना सट्टा- पट्टि चालविणारे, जुगार खेळणारे, शंकर पट चालविणारे झेंडिमुंडी जुगार खेळणारे, गांजा विक्रि सेवन करणार्याविरूध्द चंद्रपूर शहर चिमुर, माजरी, दुर्गापुर, मुल कोरपणा अवैध धंद्यांविरोधात मोठि मोहीम राबवून वेगवेगळ्या भागात अवैध व्यवसाय करणाऱे ताब्यातील आरोपींविरुद्ध सबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची पण माहीती प्राप्त झाली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शोध पथक चंद्रपूर चा कर्तव्यदक्ष सर्व पथकांनी केली.
पोलीस अधीक्षकांचे नागरीकांना आवाहन
परिसरातील कोणत्याही भागातील कोठेही अवैध रेती वाहतूक, उत्खनन, अवैध व्यवसायांची माहीती पोलीस नियंत्रण कक्ष तसेच डायल ११२ या क्रमांकावर कळवावेत.
महेश कोंडावार
पोलीस निरीक्षक
पोलीस गुन्हे शाखा चंद्रपूर