gifts to give future sister in law pfahlrohr giftig ren faire bristol coupons pizza italia reading pa coupons farming related gifts
Friday, December 2, 2022

डी. एन. सी महाविद्यालयासमोर साचले पाण्याचे तळे

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील खेडी शिवारात असलेल्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रसारक संचलित शिरीष मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी साचून असे मोठे तळे तयार झाले आहे.

- Advertisement -

या परिसरात कुठल्याही प्रकारची पाणी वाहून जाण्याची नाल्याची सुविधा नसल्यामुळे दरवेळी जोरदार झालेल्या पावसात या परिसरात प्रचंड पाणी जमा होऊन असे तळेत तयार होते. या पटांगणात मध्यभागी काही घरे असून ती अशी एखाद्या जहाजासारखी या पाण्यात उभी आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड डास निर्माण होऊन नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या साथीच्या रोगांनी सामान्य जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली असतांना अशा प्रकारे चित्र दिसणे घातक ठरत आहे.

- Advertisement -

प्रशासनाचे मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष असून या परिसरात लवकरात लवकर हे पाणी वाहून जाण्याची योग्य अशी सुविधा करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. सदर महाविद्यालयीन परिसरात सुविधांअभावी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अलीकडेच या ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले तरी अद्याप नाल्यांची सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी सदर परिसरात असे अनेक साचलेले तळे दिसून येतात.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या