Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    संपादकीय

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2026No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    महाराष्ट्रातील ३०५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळीपूर्वी ५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने दुष्काळी मदत जाहीर व्हायला नोव्हेंबरअखेर लागणार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्याचा विचार न करता शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम ६,००० कोटी रुपयांच्या घरात जाते. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २६५ तालुके अधिक ४० तालुके, म्हणजे एकूण ३०५ तालुक्यांमधील दुष्काळी शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. ही मदत दुष्काळी मदत म्हणून नव्हे, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बोनसच्या रूपाने देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे, कारण केंद्र सरकारकडून मदत जाहीर होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारची आर्थिक मदत आणि राज्य सरकारची आर्थिक मदत, अशी ती मदत घोषित होणार आहे. दरम्यानच्या काळात दुष्काळी मदत घोषित होण्यास उशीर होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनावर वेळकाढूपणाबाबत जरी टीका होणार असली, तरी काही प्रक्रियांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आपले धोरण आखत आहे. दुष्काळ जाहीर व्हायला इतका कालावधी का लागतो आहे? दुष्काळ जर प्रथमदर्शनी जाहीर झाला, मग त्यानंतर मदत का जाहीर होत नाही, हा खरा प्रश्न आहे. पाच हजार रुपये ही तुटपुंजी रक्कम त्यांच्या हातात दिली, तर ती त्यांना काहीही पुरणार नाही. पाच हजार रुपयांत या महागाईच्या काळात काहीही पुरत नाही. नवीन कपडे घेणे तर सोडाच, पण जीवनावश्यक वस्तू विकत घेणेही परवडणारे नाही. एका घरात सात ते आठ लोक आहेत, तर त्यांचा संसार कसा चालतो, हे त्यांचे त्यांनाच माहीत. कारण दिवाळीत गोडधोड करून खाण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे हे पाच हजार रुपये त्यांना दिवाळीपूर्वी दिले, तरी ते पाच जणांनाही पुरणार नाहीत. शेतकऱ्यांचा माल घरात आला असता, तर त्या मालाच्या विक्रीतून त्याला अनेक गोष्टी करता आल्या असत्या. आता फक्त पाच हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार, म्हणजे त्यातून काय होणार, याची कल्पनाच करवत नाही. कोणत्या वस्तू घ्याव्यात, कोणत्या वस्तू घेऊ नयेत, हा त्याच्यापुढे यक्षप्रश्न आ वाचून उभा आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत जाहीर व्हायला हवी होती. ती न होता फक्त पाच हजार रुपये मदत देणे हे अशोभनीय आहे. दिवाळीनंतर केंद्र सरकार केव्हा आर्थिक मदत जाहीर करेल, हे सांगता येत नाही. आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या शेतातील सर्व खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या घरात जे खरीपाचे धान्य येणार होते, ते बिलकूल येणार नाही. परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना मोठी आशा होती, पण परतीच्या पावसाने पूर्ण हात दाखवला आहे. ४० ते ५० दिवस पावसाशिवाय कोरडे गेले असल्याने रब्बीचे येणारे पीकही आता येणार नाही. म्हणजे रब्बीचा हंगाम पूर्णपणे कोरडा जाणार आहे. खरीप आणि रब्बी ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे. घरात एखादे लग्नकार्य करायचे असेल, तर ते कुणाच्या अपेक्षेने करावे? घरात एखादी दुःखद घटना घडली, तर त्यांना कसे सामोरे जावे, याची कल्पनाच केलेली बरी. पाच हजार रुपयांची तुटपुंजी आर्थिक मदत म्हणजे त्यांना कसेबसे जीवन जगण्यासाठी मदत होईल. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी म्हणजे अंधारातली दिवाळी होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif