Sunday, November 27, 2022

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. दिवाळीचा बोनस जाहीर

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मोदी सरकारने (Modi Govt) रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दिवाळी बोनसचा लाभ 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दसऱ्याच्या आधीच रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना या बोनसचे वाटप करण्यात येणार आहे. या बोनसमुळं रेल्वे प्रशासनावर 1 हजार 832 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनसच्या माध्यमातून 17 हजार 951 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. हा बोनस अराजपत्रित कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

हा बोनस रेल्वेच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. अधिकारी पदावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नॉन गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. क्लास वन, क्लास टू स्तरावरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. दरवर्षी हा बोनस दसरा आणि दुर्गापुजेच्या कालावधीमध्येच जाहीर केला जातो. महिन्याला सात हजार रुपये पगार असणारे नॉन गॅझेटेड कर्मचारी या बोनससाठी पात्र असणार आहेत. 78 दिवसांचा बोनस म्हणून जास्तीत जास्त 17 हजार 951 रुपये दिले जाणार असल्याचं पात्रतेच्या निकषांबद्दल स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. बोनस मंजूर केल्याबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराच्या वतीने पंतप्रधानांचे आभार. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवासी आणि मालवाहतूक सेवांच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या