जिल्हा दूध संघाची कार्यकारीणी बरखास्त… आ. मंगेश चव्हाणांची नियुक्ती

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली असून, आता मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह राज्य सरकारने दहा जणांना प्रशासक मंडळात नियुक्त केले आहे.

मागील कार्यकारिणीची मुदत उलटून त्यांना मुदत मुदतवाढ मिळाली होती. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या अध्यक्षा होत्या. मात्र सौ. खडसे यांची प्रकृती खराब होती त्यामुळे दूष संघाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार वसंतराव मोरे हे सांभाळत होते. सत्तांतरानंतर जिल्ह्यातही आता सत्ताकेंद्रे परिवर्तन होऊ लागल्याचे या निर्णयाने दिसून येत आहे.

हे आहेत प्रशासक मंडळात

मुख्य प्रशासक : मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव

प्रशासक : चंद्रकांत निबाजी पाटील, मुक्ताईनगर
प्रशासक : चंद्रकांत बळीराम सोनवणे, चोपडा
प्रशासक : अजय एकनाथ भोळे, भुसावळ
प्रशासक : अमोल चिमणराव पाटील, पारोळा
प्रशासक : अरविंद भगवान देशमुख, जामनेर
प्रशासक : राजेंद्र वाडीलाल राठोड, चाळीसगाव
प्रशासक : अशोक नामदेव कांडेलकर, बोदवड
प्रशासक : गजानन पुडलीक पाटील, धरणगाव
प्रशासक : अमोल पंडीतराव शिंदे, पाचोरा
प्रशासक : विकास पंडीत पाटील, भडगाव

Leave A Reply

Your email address will not be published.