जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठ्या हालचालींना वेग दिसून येत आहे. तब्बल १५२ अर्जाची विक्री झाली असून संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil), विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे (President Mandakini Khadse), माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Former Minister Dr. Satish Patil) यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
पालकमंत्र्यांसह यांनी केले अर्ज दाखल
जिल्हा दूध संघासाठी आजपर्यंत संजय पवार व सोनल पवार यांचेच अर्ज दाखल झाले होते. मात्र, सोमवारी तब्बल २२ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणारे उमेदवार असे – मंदाकिनी खडसे (मुक्ताईनगर तालुका), गुलाबराव पाटील (जळगाव तालुका), डॉ. सतीश पाटील (पारोळा तालुका), विजय रामदास पाटील (वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.), विजय पाटील (पाचोरा तालुका), पूनम प्रशांत पाटील (महिला राखीव), पूनम प्रशांत पाटील (भडगाव तालुका), हेमराज चौधरी (यावल तालुका), मधुकर राणे (बोदवड तालुका), स्मिता वाघ (अमळनेर तालुका), भैरवी पलांडे (महिला राखीव), मनीषा पाटील (महिला राखीव), ओंकार मुंदडा (धरणगाव तालुका), रमेश पाटील (जळगाव तालुका).
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज घेण्याचा व दाखल करण्याचा सोमवारी तिसरा दिवस होता. यापूर्वी पहिल्या दिवशी ७९, दुसऱ्या दिवशी ८५, तर सामेवारी तब्बल १५२ अर्जांची विक्री झाली. आजपर्यंत तब्बल ३१६ अर्जांची विक्री झाली आहे. १० नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.