Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    • नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू
    • जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत
    • आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक
    • युद्धात पाकिस्तानचे तीनतेरा : स्थिती अत्यंत वाईट
    • ड्रग्स थांबवण्याची सरकारमध्ये ताकद नाही का?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
    जळगाव

    जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृंध्दीगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव  व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

    तरी या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २९ सप्टेंबर पर्यंत या लिंकवर https://forms.gle/289521GyugghSDk99 ऑनलाईन अर्ज सादर करावा.

    या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन- “भारत @ 2047 युवा संवाद” इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

    या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता पात्रता 

    1)  स्पर्धक हा जळगाव जिल्हयातील रहिवासी असावा.

    2) वय : दि. 01/04/2022 रोजी 15 ते 29 पर्यंत.

    3)एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल.

    विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व  स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

    बक्षीस :-

    1) चित्रकला,  2) कविता लेखन व 3)  छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा:  ( सहभागी संख्या –  प्रत्येकी 30 )

    प्रथम रु. 1000/-, व्दितीय रु.750/- तृतीय रु.500/-  स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

    4) जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा :  सहभागी संख्या 10

    प्रथम रु.5000/-, व्दितीय रु.2000/- तृतीय रु.1000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

    5) जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम (समूहाकरीता) : सहभागी संच 10 – एका ग्रमप मध्ये कमीत कमी 5 जास्तीत जास्त 20 स्पर्धक ( समूहनृत्य) : प्रथम रु. 5000/-,व्दितीय रु.2500/-तृतीय रु.1250/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

    6) जिल्हास्तरीय युवा सम्मेलन- “भारत @ 2047 युवा संवाद”  सहभागी संख्या 100

    या कार्यक्रमामधील सहभागी युवकांमधून विषयाची मांडणी, वक्तृत्व शैली या आधारावर 4 चार युवकांची परिक्षकांव्दारा  निवड करुन त्यांना प्रत्येकी 1500/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

    अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, 425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल : qnykjalgaon@gmail.com कार्यालयाला संपर्क साधावा. जिल्हातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावेत असे आवाहन नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जळगाव यांनी केले आहे.

    District Administration Jalgaon district level youth festival jalgaon Nehru Yuva Kendra Jalgaon youth festival
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.