Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य बसस्थानकाला अचानक भेट!
    संपादकीय

    जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य बसस्थानकाला अचानक भेट!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 30, 2026No Comments216 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज अचानक जळगावच्या मुख्य बस स्थानकाला भेट देऊन सर्वांना चकित केले. सध्या तापमानाचा पारा 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला आहे. बस स्थानक या सार्वजनिक ठिकाणी लोकांची काय अवस्था होते आहे? हे अचानक भेटीतून कळेल म्हणून त्यांनी ही अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा अचानक भेटी दिल्या पाहिजे. बस स्थानकावर या कडक उन्हात जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेशी आहे की नाही? हे प्रथम त्यांनी पाहिले. जर पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था होती तर आरओचे थंड पाणीही मिळत होते. दुसरी बाब म्हणजे स्वच्छतेची. स्वच्छतेच्या बाबतीत थोडीशी नाराजी दिसून आली. त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्या बाबतीत सूचन संबंधित डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे सावली पुरेशी आहे काय? उन्हाळ्यात प्रत्येक जण सावली शोधत असतो. प्रवासी वर्गाला सावली मिळायला त्रास होता कामा नये, म्हणून थोडी सावलीची व्यवस्था सुद्धा अपुरी असून ती वाढविणे आवश्यक आहे. अशा सूचना डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. ज्या बाबींची त्रुटी आहे त्या सुधारण्यासाठी वाव आहे. त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. आणखीन पंधरा दिवसानंतर आपण त्याचा आढावा घेऊन त्या सुधारणा झाल्या की नाही याचा पाठपुरावा करू, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा अचानक भेटीचा कार्यक्रम स्तुत्य असून त्यांनी इतरही सार्वजनिक ठिकाणी अशाच अचानक भेटी द्याव्यात ही आग्रहाची विनंती. त्यांनी आपला मोर्चा शहरातील गार्डनकडेही वळवावा. येथे काय काय सुविधा किंवा आहेत किंवा नाहीत हे लक्षात येईल. कडक उन्हाळ्यात गार्डन हे गरिबांसाठी सावलीचे ठिकाण आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026

    महामार्ग बायपासची दशा : बायपास भरावासाठी तीन महिने!

    September 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif