Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हाधिकारी रोहन घुगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
    जळगाव

    जिल्हाधिकारी रोहन घुगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

    नाविन्यपूर्ण ओवा पिकाची पाहणी : पीएमएफएमई अंतर्गत प्रक्रिया युनिटचा शुभारंभ : स्वतः घेतला नांगर हाती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 23, 2026Updated:August 23, 2026No Comments152 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सकाळी ७ वाजता भादली बु. व असोदा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन खरीप पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नाविन्यपूर्ण ओवा पिकाची पेरणी तसेच विविध आंतरपीक पद्धतींची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

    भादली बु. येथील योगेश झांबरे यांच्या शेतात ओवा पिकाच्या पेरणीच्या वेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पिकाची सद्यस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांशी पीक पद्धती, उत्पादन क्षमता आणि नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीबाबत सविस्तर चर्चा केली. याचवेळी मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या आंतरपीक लागवडीची तसेच पिकांच्या वाढीची पाहणी करण्यात आली.

    दौऱ्यादरम्यान असोदा येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उभारण्यात आलेल्या अन्नप्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. उद्योजक दीपक प्रकाश नारखेडे यांच्या माऊली ॲग्रो ट्रेडर्स येथे नव्याने उभारण्यात आलेल्या धान्य प्राथमिक प्रक्रिया युनिट आणि आटा प्लांटचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी स्वतः जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काळ्या आईची सेवा केली. स्वतः हाती नांगर घेऊन बैलजोडी हाकत जिल्हाधिकाऱ्यांनी नांगरणीचा अनुभव घेतला.

    या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या धान्याला स्थानिक पातळीवरच सफाई, प्रतवारी आणि प्रक्रिया करण्याची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतमालाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दौऱ्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ‘आत्मा’ कुर्बान तडवी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तंत्र अधिकारी सतीश चांदे, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, पोलीस पाटील सौ. राधिका ढाके यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, प्रगतिशील शेतकरी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

    नाविन्यपूर्ण पिके व प्रक्रिया उद्योगातून समृद्धीकडे

    यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच ओवा, चिया यांसारख्या नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करून प्रयोग करावेत, असे आवाहन केले. तसेच शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी शासनाच्या पीएमएफएमई योजनेचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग उभारावेत, असे त्यांनी सांगितले. शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यांचा समन्वय साधल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. ‘नाविन्यपूर्ण पीक पद्धती आणि प्रक्रिया उद्योगातून समृद्धीकडे’ हा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी स्वीकारावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif