रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात रोग निदान शिबिर

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

घुग्घुस तालुक्यातील न्यु लाइफ वर्ल्ड मिशन फाउंडेशन संचालित, शारोन पब्लिक शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्गांची, रोग निदान शिबिर शासकीय रुग्णालय चंद्रपूर, आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, सहायाने, घेण्यात आले असता वैद्यकीय मदत कक्षाने केलेल्या स्तुत कार्यांचे शब्द सुमनांचा माध्यमातून वर्षाव केला. भविष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असेच सर्वांना सहकार्य करेल अशी पण अपेक्षा वर्तवली. पालक, विद्यार्थी व शिक्षकांचा मोठ्या संख्येत सहभाग होता.

या प्रसंगी शासकीय रुग्णालय चंद्रपूर यांनी मोफत तपासणी, मोफत उपचार, तसेच मोफत औषध उपलब्ध करून दिले. या दरम्यान मुख्य उपस्थितीत शाळेचे संस्थापक स्टीफन सुंदिल्ला, मुख्याध्यापक सौ. मैरी स्टीफन सुंदिल्ला होते. तसेच शिक्षकवर्ग, शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील डॉ. विनोद फुलझेले, डॉ. सौ शुभांगी नागपुरे, अधी परिचारिका प्राची काहीलकर, डॉ. पडगीलवर घुगुस डॉ प्राची तिवारी पांढरकवडा, औषधी निर्माता रत्नघोष मेश्राम, यांनी सहकार्य केले.

यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख ग्रामीण माणिक मारोती हिकरे, उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर ग्रामीण गोपाल पोचमपल्लीवर, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख ग्रामीण, शिल्पा गोहिल, शहर प्रमुख घुगुस ग्रामीण, मुन्ना यादव, वैद्यकीय दूत, पदाधिकारी, उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.