भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क
भुसावळ येथील दीपनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पात गॅस मशिनने कटिंगची कामे सुरू असताना आगीचा भडका उडून दोन मजूर होरपळले गेले.
ही घटना शनिवारी (ता. ५) सायंकाळी घडली. महानिर्मिततीने काम दिलेल्या भेल कंपनीच्या एका उपकंत्राटदार कंपनीकडे दोन्ही मजूर रोजंदारीने कामाला होते.
यावेळी गॅस कटींग सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने फुलगाव येथील कामगार दीपक बावस्कर व परप्रांतीय कामगार अमितकुमार भाजले गेले. दोघे सुमारे दहा ते १५ टक्के भाजले आहेत. शनिवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमी दीपक बावस्कर, अमितकुमार यांना भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना दुसऱ्या दिवशी दुपारी जळगावला हलविण्यात आले.
दीपनगर औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारांचे गॅस कटिंगचे काम सुरू असताना आगीचा भडका उडून फुलगाव येथील कामगार दीपक बावस्कर, परप्रांतीय कामगार अमितकुमार दोघे भाजले. दोघांची तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन जबाब नोंदविले आहेत. या घटनेची चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
महेश गायकवाड, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे