उपयोगिता व उपयुक्तता यातील फरक

0

 

अर्थशास्त्र लेखमाला : भाग २२

उपयोगिता
१) उपयोगिता ही वस्तू व सेवा मधील मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती होय.

२) उपयोगिता ही वस्तू सापेक्ष म्हणजे वस्तूमध्ये अस्तित्वात असते.

३) उदा. निरक्षर व्यक्ती जवळ असलेल्या पेनमध्ये उपयोगिता असते मात्र उपयुक्तता नसते

 

 उपयुक्तता
१) उपयुक्तता म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा वापर करून गरज पूर्ण करणे होय

२) उपयुक्तता ही व्यक्तीसापेक्ष म्हणजे व्यक्तीवर अवलंबून असते

३) उदा. साक्षर व्यक्ती जवळील पेनमध्ये उपयोगिता व उपयुक्तता दोन्ही घटक असतात

 

उपयोगिता व आनंद यातील फरक
१) उपयोगीता ही वस्तू व सेवा मधील मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता किंवा शक्ती होय तर आनंद हे वस्तूच्या उपभोगा पासून व्यक्तीला मिळणारी मानसिक संकल्पना आहे

२) उपयोगिता वस्तूमध्ये अस्तित्वात असते तर वस्तूच्या उपभोगापासून आनंद मिळेलच हे सांगता येत नाही.

३) उदा. आजारी व्यक्तीला इंजेक्शन मध्ये उपयोगिता जाणवते तर आजारी व्यक्तीला इंजेक्शन घेतल्यानंतर तो बरा होतो मात्र त्यापासून आनंद मिळेलच हे सांगता येत नाही

 

 उपयोगिता व समाधान यांच्यात फरक आहे उपयोगिता
१) उपयोगिता ही वस्तू मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे

२) प्रथम गरज म्हणजेच उपभोग निर्माण झाल्यानंतर उपयोगिता निर्माण होते.

३) उदा व्यक्तीला गरज तहान लागल्यानंतर पाण्यात उपयोगिता जाणवते

४) पाणी तहान लागणे म्हणजे उपभोगाचे कारण म्हणजे पाण्यातील उपयोगिता आहे

 

उपयोगिता व समाधान यातील फरक
१) वस्तूच्या प्रत्यक्ष वापर किंवा उपभोगा नंतर मिळणारा परिणाम म्हणजे समाधान होय.

२) उपभोगानंतर समाधान निर्माण होते

३) उदा. व्यक्तीला प्रत्यक्ष म्हणजे पाणी पिल्यानंतर समाधान मिळते

४) पाणी उपभोगाचा परिणाम म्हणजे समाधान होय…

 

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत
घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी १८९० मध्ये “अर्थशास्त्राची मूलतत्वे” या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे.

सिद्धांत : डॉ. मार्शल यांच्या मते, “इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.

वरील सिद्धांतवरून एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे, एखादी संतुष्टि लगातार वापरली गेली तर त्या संतुष्टीची मात्रा कमी होत जाते. या सिद्धांतानुसार, एखाद्या वस्तूचा वापर जितका जास्त होतो, तितकी त्याची उपयुक्तता कमी होते.

 

घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे काही उदाहरणे
एखादी व्यक्ती व्हॅक्यूम क्लिनरसाठी १०, ००० रुपये देते. दुसऱ्या व्हॅक्यूम क्लिनरची ग्राहकासाठी फारसे उपयुक्तता मूल्य नसल्यामुळे, तोच व्यक्ती दुसऱ्या व्हॅक्यूम क्लिनरसाठी फक्त ४, ००० रुपये अथवा त्यापेक्षा कमी किंमत देण्यास तयार होईल.

 

घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची काही वैशिष्ट्ये

  • सीमांत उपयोगिता कमी होण्याचा सिद्धांत थेट किमती कमी करण्याच्या संकल्पनेशी संबंधित आहे.
  • सीमांत उपयोगिता कमी झाल्यावर, ग्राहक अधिक उत्पादनासाठी कमी रक्कम देण्यास तयार होतात.
  • सीमांत उपयोगिता शून्य झाल्यावर कुल उपयोगिता जास्त होते.

 

घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते
 हा सिद्धांत खरा टाकण्यासाठी मार्शल यांनी सिद्धांतात पुढील परिस्थिती स्थिर किंवा गृहिते मांडलेली आहेत..

1) विवेकशीलता: म्हणजेच व्यक्तीला एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आहे हे समजणे म्हणजे विवेकशील होय व्यक्ती सर्वसामान्य असली पाहिजे. व्यसनी वेड्या लोकांना हा सिद्धांत दिसून येत नाही.

2)  उपयोगितेचे संख्यात्मक मापन: सिद्धांतात वस्तू पासून मिळणारी उपयोगिता संख्येत मोजता येते असे गृहीत धरले आहे.

3) वस्तूचा एकजिनसीपणा: सिद्धांतात सर्व वस्तू म्हणजेच सर्व पेरू रंग, रूप, आकार, चव इ. बाबत एकजिनसी किंवा समान आहेत असे गृहीत धरले आहे.

4) वस्तूच्या उपभोगात सातत्य असावे: म्हणजेच एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे घेतला पाहिजे उदा. सर्व पेरू क्रमाने खावेत त्यात खंड नसावा

5) वस्तूचा आकार योग्य असावा तो फार लहान किंवा मोठा असू नये.

6) व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, सवयी, आवडनिवडी, स्थिर असावे.

7) वस्तू विभाज्यता असावी :  मोठ्या वस्तूचे लहान भागात विभाजन करता येते

8) एकच गरज पूर्ण करण्यासाठी व्यक्ती एका वस्तूचा वापर करतो

9) पैशाची सीमांत उपयोगिता किंवा मूल्य स्थिर असते

डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com

Leave A Reply

Your email address will not be published.