सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्र एकमेकांशी संबंधित आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे, जी अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक एजंट्सच्या वर्तनावर आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते. जसे की ग्राहक, घरे, उद्योग, कंपन्या इ. विविध व्यक्तींमध्ये त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मर्यादित संसाधनांचे वाटप कसे करावे हे शोधते. वाटप केले जाते? त्याच वेळी, ते जास्तीत जास्त उत्पादन आणि सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी संसाधनांच्या सर्वोत्तम संभाव्य वापरासाठी अटी निर्दिष्ट करते.
या अभ्यासातूनच समग्र अर्थशास्राला आर्थिक धोरणे आणि कार्यक्रम तयार होण्यास मदत होते. आपल्याला माहित आहे की, अर्थव्यवस्थेतील बदल आणि प्रक्रिया हे लहान आणि मोठ्या दोन्ही घटकांचे परिणाम आहेत जे एकमेकांवर परिणाम करण्याची क्षमता टिकवून ठेवतात किंवा एकमेकांवर थेट परिणाम करतात.
उदाहरणार्थ: जरी कर वाढ हा एक व्यापक आर्थिक निर्णय आहे, परंतु त्याचा कंपन्यांच्या किंवा व्यक्तिगत बचतीवर होणारा परिणाम हा सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण आहे.
सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics)
- सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अॅडम स्मिथ पासून झाली.
- सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्ती संस्था या लहान घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो.
- सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ असते.
- सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास काही गृहितावर आधारलेला असतो.
- सूक्ष्म अर्थशास्त्र हे निव्वळ तत्त्वांची किंवा सिद्धांताची चर्चा करते.
- सूक्ष्म अर्थशास्त्र सीमांत उपयोगिता विश्लेषणावर आधारित आहे.
- सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकाचा अभ्यास केला जातो.
- वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते.
- सूक्ष्म अर्थशास्त्र स्थिर अर्थव्यवस्थेचा अभ्यास
- सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास रिकार्डों, जे. बी. से मिल, मॉरिस डॉब, बोल्डिंग, डॉ. मार्शल, हिक्स सॅम्युअलसन, मिसेस जोन रॉबिन्सन इ. नी केला.
- सूक्ष्म अर्थशास्त्रात सरासरी किंमत पातळी कायम असते, असे समजून निरनिराळ्या किंमतीत होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो.
- सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाने महत्वाची धोरणे आखता येत नाहीत.
- उत्पादनात होणाऱ्या वाढीच्या कारणांचा विचार परिस्थितीनुसार सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.
- अर्थशात्राचे विवेचन करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र पद्धतीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.
- सूक्ष्म अर्थशास्त्राची मर्यादा म्हणजे ते एकूण अर्थव्यवस्थेतील आर्थिक उलाढालीवर भाष्य करू शकत नाही.
- सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती उत्पादन मूल्य निश्चिती, पटक किमतीचे निर्धारण, बाजार यंत्रणा व साधन संपत्ती वाटप, उत्पादन विषयक सिद्धांत आणि कल्याणकारी अर्थशास्त्र या विषयांपर्यंत पसरली आहे.
- निरनिराळ्या ठिकाणी व निरनिराळ्या व्यवसायात वेतनात फरक का असतो यांचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते.
- सूक्ष्म अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो.
स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics)
- स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात माल्थसने केली.
- स्थूल अर्थशास्त्रात एकूण गट उद्योग या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो.
- स्थूल अर्थशास्त्र हे समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ असते.
- स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास गृहितावर आधारलेला नसतो.
- स्थूल अर्थशास्त्र हे केवळ सिद्धांताची चर्चा न करता राष्ट्राला उपयुक्त अशा विविध धोरणांची चर्चा करते.
- स्थूल अर्थशास्त्रात सीमांत उपयोगिता विश्लेषणाला स्थान नाही.
- स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील समुच्चययाचा किंवा सरासरीचा अभ्यास केला जातो.
- स्थूल अर्थशास्त्रात गतीमान अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो.
- सामूहिक समस्या सोडविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगी पडते.
- स्थूल अर्थशास्त्राचा विकास कार्ल मार्क्स, बॉलरा, विक्सेल, फिशर, केन्स, हॉट्रे इत्यादींनी केला.
- स्थूल अर्थशास्त्रात सरासरी किंमतपातळीचा आणि त्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो.
- स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणाने महत्त्वाची धोरणे आखता येतात.
- दीर्घकाळाच्या संदर्भातील विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जातो.
- अर्थशास्त्राचे विवेचन करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र पद्धतीचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे.
- स्थूल अर्थशास्त्राची प्रमुख मर्यादा अशी की, ते सूक्ष्म पातळीवरील प्रवृत्तीचा अभ्यास करू शकत नाही.
- स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत राष्ट्रीय उत्पन्न, विश्लेषण, आर्थिक विकास, उत्पन्न व रोजगाराची पातळी, सार्वजनिक वित्त व्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यवहार या सारख्या विषयांचा समावेश होतो.
- सर्वसाधारण वेतनाची पातळी आणि वेतनदर यांचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते.
- स्थूल अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय किंमती आंतरराष्ट्रीय रोखता याविषयीचे प्रश्न अभ्यासले जातात.
क्रमशः