गुराच्या धडकेने जखमी झालेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू…

0

 

यावल,लोकशाही न्यूज नेटवर्क;

गेल्या आठवड्यात योगा योग पेठ येथील रहिवासी नथ्थु यशवंत पाटील (बारी) ( वय ५५) यांना मोकाट गुराने जोरदार धडक मारल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू ओत. मात्र रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. या संदर्भात शहरातील विविध संघटनानी नागरिकांनी मोकाट गुरांबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासकीय विभाग दखल घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मोकाट गुरे मालकांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी बारी यांच्या कुटुंबीयांकडून मागणी होत आहे. पाटील खाजगी कामगार म्हणून कार्यरत होते त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार गेला असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

येथील बारी वाड्यातील नथ्थु यशवंत पाटील यांना २२ ऑगस्ट रोजी मोकाट गुराने जोरदार धडक दिली असता ते खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारा नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. तेथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.