Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    • बोदवडमध्ये गुंडगिरीविरोधात जनक्षोभाचा उद्रेक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»‘धुरंधर २’ अडकला कायदेशीर चौकटीत
    मनोरंजन

    ‘धुरंधर २’ अडकला कायदेशीर चौकटीत

    बंदीची मागणी, उच्च न्यायालयात याचिका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2026No Comments268 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. सोशल मीडियापासून सगळीकडे या चित्रपटाची आणि त्यातील रणवीर सिंगसह प्रत्येक कलाकाराच्या कामाची चर्चा सुरु आहे. पण आता हा चित्रपट नव्या वादात सापडला आहे. मद्रास उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली असून, तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहिता नियमांचा आधार घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

    मिळालेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्या वकिलाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ‘धुरंधर २’ हा चित्रपट राजकीय विषयांवर आधारित असल्याने निवडणूक काळात त्याचे प्रदर्शन मतदारांवर परिणाम करू शकते. त्यामुळे या कालावधीत चित्रपटावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फॉर्मल रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच तातडीच्या सुनावणीसाठी अर्ज करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे चित्रपटावर स्थगिती द्यायची की नाही, याचा अंतिम निर्णय पुढील सुनावणीनंतरच होणार आहे.

    ‘धुरंधर २’ हा चित्रपट १९ मार्च रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या पाच दिवसांत ८०० कोटींच्यावर कमाई करत ‘धुरंधर २’ ने ‘पुष्पा २’, ‘बाहुबली २’, ‘RRR’ आणि ‘KGF 2’ यांसारख्या मोठ्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif