रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’मध्ये बहुरंगी अॅक्शनची आतषबाजी

0

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’मध्ये बहुरंगी अॅक्शनची आतषबाजी

मुंबई वृत्तसंस्था रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’ सध्या प्रदर्शित होताच तिकीटबारीवर जोरदार कमाई करीत असून, त्यातील हटके अॅक्शन सीक्वेन्समुळे प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आला आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे चार भिन्न शैलींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्शन मास्टर्स एकत्र येऊन तयार केलेला अॅक्शनचा अफलातून संगम.

चित्रपटातील अॅक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी एजाज गुलाब, सी-यंग ओह, यानिक बेन आणि रामझान बुलुत या चार दिग्गजांनी सांभाळली आहे.

एजाज गुलाब यांनी विशाल आउटडोअर युनिट्स, अचूक वाहन सीक्वेन्स आणि नियंत्रित कोलिजनसह भारतीय प्रॅक्टिकल अॅक्शनची पारंपरिक झलक प्रभावीपणे आणली. सी-यंग ओह यांनी उत्कृष्ट कोरियन क्लोज-कॉम्बॅट शैली आणि अचूक फाईट कोरिओग्राफीद्वारे दृश्यांना धारदार परिणाम दिला.
यानिक बेन यांनी युरोपियन पार्कौर-शैलीच्या वेगवान मूव्हमेंटमुळे चित्रपटाची एकूण गती आणि थ्रिल अधिक वाढवले. रामझान बुलुत यांनी युरोपियन-तुर्की क्लोज-क्वार्टर्स रियलिझमच्या मिश्रणातून तणावपूर्ण आणि वास्तवदर्शी अॅक्शन सादर केली.

रणवीर सिंगसोबतच चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या दमदार अभिनेत्यांची उपस्थिती असून, त्यांच्या भूमिकांमुळेही ‘धुरंधर’चे आकर्षण वाढले आहे. बहुशैली अॅक्शन, दिग्गज कलाकार आणि गतिमान कथानकामुळे ‘धुरंधर’ सध्या प्रेक्षकांना अॅड्रेनालिनचा भन्नाट अनुभव देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.