Friday, December 9, 2022

धक्कादायक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

- Advertisement -

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षकाचं नाव प्रविण कदम असं आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी हिरे महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

कारण अस्पष्ट

- Advertisement -

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण कदम हे धुळ्यात नियुक्त होते. त्यांनी प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेत जीवन संपवले. मृत्यूपूर्वी कदम यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं कदम यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. दरम्यान पोलीस अधिकारी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

कदम जळगाव जिल्ह्यातील रहिवासी

प्रवीण कदम हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील तळेगाव या गावचे रहिवासी आहेत. प्रवीण यांचे वडील भुसावळ येथे ऑडिओ मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. दरम्यान वडिलांचे नोकरीनिमित्त पुणे येथे स्थलांतर झाल्यानंतर प्रवीण यांचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे झालं.

तीन वर्षांपूर्वी बढती

तीन वर्षांपूर्वी त्यांना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली होती. प्रवीण कदम यांचे संपूर्ण कुटुंब नाशिक येथे स्थायिक असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नाशिक शहरात सुप्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ही त्यांची एक वेगळी ओळख होती.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या