Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»ब्रेकिंग.. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रोकड
    उत्तर महाराष्ट्र

    ब्रेकिंग.. धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रोकड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    धुळ्यामधून मोठी बातमी समोर आलीय. धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. तसेच ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती.

    अखेरी पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली क्रमांक 102 चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण 29 आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या आमदारांना देण्यासाठीच पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

    एक कोटी 84 लाख 84 हजारांची रोकड

    खोली क्रमांक 102 मध्ये रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर, माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशीची मागणी केली होती. या मागणीस पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खोली क्रमांक 102 च्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा प्रक्रिया पार पडली. यावेळी खोलीचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या तपासणीत एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड सापडली आहे. तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली आहे. आज पहाटेपर्यंत शासकीय गुलमोहर विश्रामगृह याठिकाणी रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरू होती. याप्रकरणी आज धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अर्जुन खोतकरांनी आरोप फेटाळले

    महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती नेतृत्व करणारे आमदार अर्जुन खोतकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले आहेत. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच सबंध नसल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे. माझा पीए त्या रूममध्ये राहत नव्हता, हे सर्व प्लांट केले गेले असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.

    ‘बक्षिस’ देण्यासाठी..

    या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं… धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आ. अनिल गोटे साहेब त्या १०२ क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळं अंदाज समितीच्या ‘दैदिप्यमान कामगिरी’वर आणि ‘बक्षिस’ म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं गेलं, असे त्यांनी म्हटले आहे.

    काळ्या यादीत टाकण्याची धमकी..

    संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहे, ती योग्य प्रकारे झाली की नाही? ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते. परंतु, धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाला आहे. भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित १० कोटी नंतर जमा होणार होते. शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले, ही समिती विशेषता समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर किती भ्रष्ट आहे, ते समोर आले आहे. १५ कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे.

    #dhule Anil Gote Arjun Khotkar Gulmohar Government Rest House Rohit Pawar Sanjay Raut
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif