धोनीचे लवकरच टीम इंडियात पुनरागमन; BCCI च्या हालचाली सुरु…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

टीम इंडियाला 2007 साली एकमेव टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची आठवण आजही झाल्याशिवाय राहत नाही. भारताला T-20 वर्ल्डकपमध्ये व वनडेमध्ये जगभरातत भारताल चमकावणारा खेळाडू म्हणजे एसएस धोनी हा होय.

भारतीय संघाची यंदाच्या T-20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य करीत झालेल्या पराभवाची नामुष्की पाहता, बीसीसीआय आगामी काळात टीममध्ये मोठे बदल करू पाहत आहे. असे सांगितले जात आहे की, सेवानिवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर BCCI नवीन जबाबदारी देणार आहे. धोनीला मर्यादित षटकांसाठी (T20 आणि ODI) प्रशिक्षक किंवा संचालक बोर्डावर घेतले जाणार आहे.

एकंदरीत भारतीय संघातील नव्या दमाच्या खेळाडूंच्या जडणघडणीसाठी धोनीची पुन्हा एंट्री होणार आहे. माध्यमातील अहवालानुसार, बीसीसीआय इंग्लंडच्या धर्तीवर मर्यादित षटकांसाठी आणि कसोटींसाठी स्वतंत्र संघ तयार करण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही तर या संघांसाठी वेगवेगळे कोचिंग स्टाफही नियुक्त करता येईल.

खरं तर, द्रविडवरील वर्कलोड कमी करण्यासाठी बोर्ड कोचिंगची भूमिका सामायिक करण्यावर विचार करत आहे. धोनीच्या टी-20 फॉरमॅटमध्ये समावेश करण्याबाबत विचार केला जात असल्याचे मानले जात आहे. यामुळे टीम इंडियाचा या फॉरमॅटचा दर्जा उंचावला जाऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेची बैठक होणार असून धोनीचा मुद्दा चर्चेसाठी येऊ शकतो. दरम्यान, यापुर्वी धोनीशी चर्चा केली जाणार आहे.

2023 मध्ये, एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतात खेळवला जाणार आहे. यानंतर 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. अशा स्थितीत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी जवळपास 1 वर्ष आणि टी-20 विश्वचषकासाठी 2 वर्ष शिल्लक आहेत. या दोन्ही विश्वचषकासाठी नवीन संघ तयार व्हावा, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.