धीरेंद्र शास्त्री यांची जळगाव शहराजवळ कथा

जागेची पाहणी करून नियोजनाला सुरुवात

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरा नजीक असलेल्या पाळधी जवळील झुरखेडा गावठाणात 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान बागेश्वर धाम येथील बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या भव्य दिव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी असलेल्या जागेची पाहणी काल रविवार १ डिसेंबर रोजी शहरातील निवडक मान्यवरांनी केली.

या भव्य जागेवर लवकरच भव्य दिव्य मंडप उभारला जाणार असून 25 तारखेपासून रोज दुपारी तीन ते सहा या वेळेत धीरेंद्र शास्त्री कथेचे निरूपण करणार आहेत. या जागेची पाहणी करताना सर्व कार्यकर्ते भाविक यांना सूचना देऊन जागेचे लवकरात लवकर सपाटीकरण कसे होईल, याबाबत आखणी केली. बागेश्वर धाम येथील काही महंत आज जळगावात येणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनाची पाहणी ते करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.