बागेश्वर बाबा येणार महाराष्ट्रात, पोलिसांची बारीक नजर

0

मीरारोड, लोकशाही न्यूज नेटवर्क

धीरेंद्र प्रसाद शास्त्री (Dhirendra Prasad Shastri) हे नाव आज सर्वांनाच ज्ञात आहे. मीरारोड येथील सेंट्रल पार्क मैदानात धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे दिव्य दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शांताबेन मिठालाल जैन चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मीरारोड पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. बागेश्वर धाम सरकार कार्यक्रम आयोजक कमिटी सदस्य सुरेश खंडेलवाल यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवस (18 मार्च आणि 19 मार्च) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात 10 हजाराहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत.

काय आहे नोटीस मध्ये

धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी यापूर्वीच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवून समाजाचे विविध मार्गाने आर्थिक मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करुन लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करतात. त्यामुळे अखिल भारतीय निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेस पक्षाते पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला विरोध असल्याची तक्रार मीरा रोड पोलीस ठाण्यात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here