बांभोरीत तरुणाची आत्महत्या

0

बांभोरीत तरुणाची आत्महत्या

जळगाव तालुक्यातील बांभोरी येथे एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २८ डिसेंबर) घडली. शुभम विश्वनाथ सपकाळे (वय २०, रा. बांभोरी) असे मृत तरुणाचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत कामाला होता. शुभम हा आई-वडिलांसोबत बांभोरी येथे वास्तव्यास होता.

रविवारी आई-वडील घराबाहेर गेलेले असताना शुभम घरी एकटाच होता. याच काळात त्याने घरामध्ये गळफास घेतला. काही वेळाने आई-वडील घरी परतले असता शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती शुभमला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे बांभोरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुण वयातच शुभमच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.