धरणगाव बसस्थानकात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी

0

धरणगाव बसस्थानकात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला

धरणगाव, – धरणगाव बसस्थानक आवारात एका ७० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुमबाई अमृत पाटील (वय ७०, रा. रोटवद, ता. धरणगाव) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून, २२ एप्रिल रोजी कामानिमित्त जळगाव शहरात आल्या होत्या. बसस्थानकाच्या आवारात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोउनि करीम सैय्यद करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.