लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा काढला आहे. महाल येथील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन ते चिटणीस पार्क चौकातून हा मोर्चा थेट गडकरींच्या घराबाहेर जमा झाला. आंदोलनासाठी युवक काँग्रेसने प्रचार पोस्टर प्रसिद्ध केले पोस्टरमध्ये, “धर्मेंद्र प्रधान तो झांकी है… नितीनजी अभी बाकी है!” असा उल्लेख करण्यात आला आहे. चिटणीस पार्क चौकात मोठा पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेटची व्यवस्था करण्यात आली असून आंदोलकांची धरपकड सुरू आहे.
आंदोलकांना अडवल्याने पोलीस आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यात संघर्ष जोरदार संघर्ष सुरू पाहायला मिळाला. E20 च्या मुद्द्यावरून काँग्रेसने हा मोर्चा काढला असून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्याने वाहन खराब होत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानाबाहेर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.
शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इथेनॉलच्या वापरावरून नितीन गडकरी यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

