धक्कादायक; हॉटेलमध्ये ५०० जणांचे धर्मपरिवर्तन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एका धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. एका हॉटेलमध्ये तब्बल ५०० लोकांचं एकत्रित धर्म परिवर्तन केलं जात होत. या प्रकारची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मांतराची प्रक्रिया थांबवली.

यावेळी विश्व हिंदू परिषद आणि धर्मांतर करणाऱ्या आयोजकांमध्ये जोरदार गोंधळ झाला. त्यामुळे हॉटेलमध्ये जमलेले लोकसुद्धा पळून गेले. त्यांनंतर पोलिांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

धर्मांतराचं हे प्रकरण रविवारी भरतपूर शहरातील अटल बंद ठाण्याच्या परिसरात घडलं. एका हॉटेलमध्ये हे परिवर्तन केलं जात होत. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, खिश्चन धर्माच्या लोकांकडून सत्संगाच्या माध्यमातून धर्मांतर केले जाणार होत. यामध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला आणि तरुणींचा समावेश होता.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अश्रुधुरांच्या नळकांड्या घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिवाय ५ ते ७ महिला आणि तरुणींना सुद्धा अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २० ठिकाणांवर असच धर्मपरिवर्तन केलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.