Friday, May 20, 2022

धरणगाव येथील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

येथे सहा वर्ष वयाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग करून अत्याचार झालेला आहे. या अत्यंत संतापजनक व निंदनीय घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. तसेच संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, हा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा आणि पिडीत कुटुंबाला शीघ्रतेने शासकीय मदत मिळावी.

- Advertisement -

असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना देण्यात आले. सदर निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटिल, महिला जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षीताई चव्हाण, महानगर सरचिटणीस सुनीलभाऊ माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, अकिल पटेल, विशाल देशमुख, सुशील शिंदे, दिपीका भामरे, अभिलाषा रोकडे, आशा अंभोरे, सुष्मीता भालेराव, जयश्री पाटिल, छाया केळकर, राहुल टोके, सुहास चौधरी, शंभू रोकडे, चंद्रमणी सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या