परिवाराला मारण्याची धमकी: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गोळी देत शेतात, दोघांवर गुन्हा दाखल

0

धरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला धरणगाव शिवारातील एका शेतात नेवून परिवाराला मारण्याची धमकी देवून दोघांकडून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीला आले आहे.

याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शिवारातील शेतात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह राहते. सन २०२३च्या दिवाळीनंतर ४-५ दिवसांनी पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटची गोळी सारखी काहीतरी गोळी देऊन तिला संशयित आरोपी प्रवीण छत्र्या बारेला रा. कानळदा ता. जि.जळगाव हा तिच्यावर शेतात जाऊन अत्याचार करत होता. तसेच त्याने तिला कोणाला काही सांगितले तर जीवेठार मारेन अशी धमकी दिली होती.

दरम्यान ही बाब पन्नालाल मराठे (रा. धरणगाव याला समजले, त्याने देखील मुलीला एकट्यात गाठून प्रवीण बारेला यांनी केलेले अत्याचाराबाबत बाहेर सर्वांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने देखील तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. दरम्यान तीच्या आई-वडिलांसह पीडितेने तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार मंगळवारी ९ जुलै रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी प्रवीण छत्र्या बारेला रा.कानळदा ता.जि.जळगाव आणि पन्नालाल मराठे रा. धरणगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पन्नालाल मराठे याला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.